प्रतापगड,
Raja Bhaiyas statement प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा मतदारसंघाचे आमदार आणि जनसत्ता दल (लोकशाही) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या एका वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. जाहीर सभेत बोलताना त्यांनी धर्मांतर आणि संविधान यासंदर्भात केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेला उधाण आले आहे. या सभेत बोलताना राजा भैय्या यांनी इतिहासातील धर्मांतराच्या प्रक्रियेवर भाष्य करताना आजचे मुस्लिम पूर्वी हिंदू समाजातीलच असल्याचे विधान केले. तसेच दबाव किंवा प्रलोभनामुळे धर्मांतर करणाऱ्यांवर टीका करताना त्यांनी त्यांना भित्रे आणि स्वार्थी असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

याच भाषणात त्यांनी सनातन परंपरा आणि संविधान याबाबतही मत व्यक्त केले. सनातन परंपरा टिकली नाही तर संविधानही टिकणार नाही, असे त्यांनी म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानांचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून त्यावरून चर्चेला वेग आला आहे. Raja Bhaiyas statement या वक्तव्यानंतर प्रतापगडपासून लखनौपर्यंत राजकीय वातावरण तापले असून, समर्थकांनी त्याला राष्ट्रीय विचारसरणीशी जोडले आहे, तर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.