इस्रोमध्ये संशोधन प्रकल्प पूर्ण करणाऱ्या आदित्य तलांडे यांचा नागरी सत्कार

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
झरीजामणी, 
aditya-talande : येथील होतकरू विद्यार्थी आदित्य कृष्णाजी तलांडे यांनी एम. टेक. इन ऑप्टिकल इंजिनीअरिंग ही पदवी यशस्वी पूर्ण करीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये संशोधन प्रकल्प पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 
 
y19May-Aaditya-Talande
 
 
 
आदित्य तलांडे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील प्रतिष्ठित आणि नामांकित अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये संशोधन प्रकल्प पूर्ण करणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते. ग्रामीण भागातून शिक्षण घेत मोठ्या संस्थेत पोहोचलेल्या आदित्यच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
 
 
आदित्यच्या या यशाबद्दल गावात विशेष अभिनंदन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी आकर्षक फलक लावण्यात आला होता. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
यावेळी उपस्थितांनी आदित्यच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आदित्य तलांडे यांच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.