कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सैफला मिळाला होता विचित्र सल्ला

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
Saif received some bizarre advice बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या नव्या गुन्हेपट मालिकेमुळे चर्चेत आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या संघर्षांविषयी अनेक आठवणी शेअर केल्या.
 
Saif ali khan
 
अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असताना त्याचे अमृता सिंग यांच्यासोबत लग्न झाले होते. त्या काळात एका ज्येष्ठ अभिनेत्याने त्याला हे लग्न गुप्त ठेवण्याचा सल्ला दिल्याचे सैफने सांगितले. Saif received some bizarre advice  विवाहित असल्याचे चाहत्यांना समजल्यास त्याच्या प्रतिमेवर परिणाम होईल आणि लोकप्रियता कमी होईल, अशी भीती त्या अभिनेत्याने व्यक्त केली होती. मात्र, हा सल्ला आयुष्यात मिळालेल्या सर्वात विचित्र सल्ल्यांपैकी एक असल्याचे सैफने स्पष्ट केले.
 
सैफने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील असुरक्षिततेबद्दलही खुलासा केला. चित्रपटसृष्टीतील कुटुंबातून येऊनही स्वतःची ओळख निर्माण करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. Saif received some bizarre advice  एका चित्रपट निर्मात्याने त्याला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करू नकोस, असेही सांगितले होते. त्या भूमिकेत तो प्रभावी दिसणार नाही आणि प्रेक्षक त्याची खिल्ली उडवतील, असे त्यावेळी त्याला सांगण्यात आले होते.
 
याबाबत बोलताना सैफने सांगितले की, अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात प्रेक्षक आपल्यावर हसतील, अशी भीती अनेक कलाकारांच्या मनात असते. Saif received some bizarre advice  स्वतःलाही ती भीती वाटत होती, असे त्याने मान्य केले. मात्र काळानुसार आत्मविश्वास वाढत गेला आणि अभिनयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. आपल्या कामाबाबत आपण नेहमीच प्रामाणिक राहिलो असून अभिनय ही केवळ लोकप्रियतेसाठी नव्हे, तर समर्पणाने करायची कला आहे, असा विश्वास असल्याचेही सैफ अली खानने सांगितले.