पोहण्याच्या स्पर्धेत सुधांशू वाडीवेची देदीप्यमान कामगिरी

यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sudhanshu-wadive : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट सिनिअर आणि लोअर एज ग्रुप अ‍ॅक्वॅटिक चॅम्पियनशिपमध्ये यवतमाळच्या 8 वर्षीय सुधांशू मनीष वाडीवे याने आपल्या कौशल्याने विदर्भ विभागाचे नाव उंचावले आहे. विदर्भातील एक उगवता तारा म्हणून सुधांशूने या राज्यस्तर स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
y19May-Sudhanshu
 
 
 
विख्यात प्रशिक्षक आदित्य पाचखेडे यांच्या मार्गदर्शनात सुधांशूने महाराष्ट्रातील दिग्गज जलतरणपटूंना कडवी झुंज दिली. त्याच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या जलतरण नकाशावर यवतमाळचे स्थान आता अधिक गडद झाले आहे. यवतमाळमधील द बीच क्लब, डॉल्फिन स्विमिंग अकादमी आणि शाळेमधील जलतरण तलावाने सुधांशूसारख्या उदयोन्मुख खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
 
 
मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांचे जलतरण क्षेत्रात वर्चस्व राहिले आहे. तिथे उपलब्ध असलेले ऑलिम्पिक दर्जाचे पुल आणि व्यावसायिक अकादमींमुळे या शहरांतील खेळाडू नेहमीच आघाडीवर असतात. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सुधांशू वाडीवेने नोंदवलेले निकाल उल्लेखनीय असाच आहे.
 
 
सुधांशूच्या या यशात त्याचे प्रशिक्षक आदित्य पाचखेडे, कुंदन येलम अभिर बनसोड, श्याम पाम्पटीवार, अशोक जैस्वाल आणि ऋषिका बोदेले यांनी त्याला मोलाचे प्रोत्साहन आणि पाठबळ दिले.
राज्यातील अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान
 
 
अत्यंत तांत्रिक मानल्या जाणाèया 8 वर्षांखालील गटात सुधांशूने चमकदार कामगिरी केली. विशेषतः 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात त्याने 1:06.68 अशी वेळ नोंदवत राज्यात 10 वा क्रमांक पटकावला. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या वर्चस्वाला छेद देत सुधांशूने दाखवलेले सातत्य कौतुकास्पद ठरले आहे.