'हाथ मत लगाओ'... गोविंदाचे बाउंसर आणि पॅपाराझी आपापसांत भिडले

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई
Govinda नव्वदच्या दशकात आपल्या भन्नाट डान्स स्टाईल आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या चित्रपटांपेक्षा एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गोविंदाच्या बाऊन्सर्स आणि पॅपाराझींमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसत असून परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.
 

Govinda  
एका मनोरंजन कार्यक्रमाला गोविंदा उपस्थित राहिले होते. काळ्या रंगाच्या सूटमध्ये त्यांनी कार्यक्रमात एंट्री घेताच चाहत्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान गोविंदाने त्यांच्या जुन्या सुपरहिट गाण्यांवर खास अंदाजात नृत्य सादर केले. मॉडेल्ससोबत त्यांनी स्टेजवर ठेका धरल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
 
 
मात्र, कार्यक्रमादरम्यान फोटो Govinda आणि व्हिडीओ काढण्यावरून गोविंदाच्या सुरक्षारक्षकांचा पॅपाराझींशी वाद झाला. व्हायरल व्हिडीओनुसार, काही छायाचित्रकार पुढे येऊन चित्रिकरण करण्याचा प्रयत्न करत असताना बाऊन्सर्सनी त्यांना रोखले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि काही क्षणांतच वातावरण तापल्याचे दिसून आले. बाऊन्सर्सनी पॅपाराझींना मागे ढकलल्याचाही आरोप करण्यात येत आहे.स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच गोविंदा स्वतः तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांतपणे दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला. बाऊन्सर्सना संयम बाळगण्यास सांगतानाच पॅपाराझींनाही शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.या घटनेनंतर सोशल मीडियावर गोविंदाच्या शांत आणि संयमी स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले आहे. “गोविंदांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला”, “तो खरा जेंटलमन आहे” तसेच “आजही त्यांचा स्वभाव तितकाच साधा आहे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.