क्लबमध्येच 'अश्लील चाळे'… शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार?

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे,
Shilpa Shetty पुण्यातील मुंढवा परिसरातील प्रसिद्ध बॅस्टियन क्लब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी संबंधित असलेल्या या उच्चभ्रू क्लबमधील कथित अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून शहरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुण्यातील पब आणि नाईटलाइफ संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

Shilpa Shetty 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी आणि मद्यधुंद वातावरण दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी काही तरुण-तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असल्याचे दृश्य कथितरित्या या व्हिडिओमध्ये कैद झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्या वेळी क्लबमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित असल्याचेही दिसून येत आहे.
 
 
हा व्हिडिओ सोशल Shilpa Shetty मीडियावर वेगाने शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन होत असल्यामुळे नागरिक आणि पालकवर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरुण पिढीवर अशा वातावरणाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही अनेकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, मुंढवा परिसरातील हा क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे पुण्यातील क्लब, पब आणि नाईटलाइफ व्यवस्थापनाच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.मात्र, या व्हिडिओची सत्यता, तो नेमका कधीचा आहे आणि त्यातील दृश्ये कोणत्या परिस्थितीत चित्रित करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच पोलिस किंवा क्लब व्यवस्थापनाकडूनही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरीही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.