नागपूर,
memorial day स्व. बळवंतराव ढोबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले सुसंस्कृत, शालीन आणि सभ्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा राजकीय प्रवास जनसंघापासून भारतीय जनता पक्षापर्यंतचा होता. युती शासनाच्या काळात ते विधान परिषदेसाठी दणदणीत मताधिक्याने निवडून आले होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अत्यंत पारदर्शक आणि लोकाभिमुख होते.
४ जुलै १९२५ रोजी जन्मलेल्या बळवंतरावांनी दीर्घायुष्य गाठावे, अशी सर्वांची इच्छा असतानाच ६ मे २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या सर्व मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेतले असून त्यांचा मुलगा मोरेश्वर ढोबळे हे सिव्हिल इंजिनिअर असून शासकीय कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. memorial day वडिलांनी दिलेल्या सामाजिक दायित्वाच्या परंपरेचे पालन करत ते विविध सामाजिक संस्थांना मदतीचा हात देत असतात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वानप्रस्थ आश्रम तसेच शैक्षणिक संस्थांना ते सातत्याने आर्थिक सहाय्य करतात.
स्व. बळवंतराव ढोबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मोरेश्वर ढोबळे यांनी श्री उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट अंतर्गत बहादुरा, दिघोरी नाका, नागपूर येथील महेश्वर वानप्रस्थ आश्रमातील आश्रित, पुजारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती. मोरेश्वर ढोबळे यांच्या विनम्र स्वभावाने आणि आदरातिथ्याने आश्रमातील आश्रित भारावून गेले. काहींच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. त्यांनी आश्रमातील ज्येष्ठांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. memorial day त्या भावनिक क्षणांनी उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
या वानप्रस्थ आश्रमातील व्यवस्था अत्यंत चांगली असून परिसरही विस्तीर्ण आहे. येथे भगवान श्रीकृष्णांचे सुंदर मंदिर आहे. दररोज दुपारी १२.३० वाजता भगवानाच्या मूर्तीस नैवेद्य अर्पण केला जातो. memorial day त्यानंतर त्या नैवेद्यातील दोन चपात्या गोशाळेतील ४९३ गाईंमधील कोणत्याही दोन गाईंना खाऊ घातल्यानंतरच श्लोक पठण करून आश्रमवासी भोजन ग्रहण करतात.
सौजन्य: गजेंद्र डोळके, संपर्क मित्र