वनविभागाकडून हक्काच्या जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात

अतिक्रमण हटवून ‘अटल घनवन’ उपक्रमाचा शुभारंभ

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
atal ghanvan राज्य शासनाच्या वनसंवर्धन धोरणानुसार वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक तीव्र केली असून सोमवार, 25 मे रोजी हदगाव वनपरिक्षेत्रात हदगाव येथील अतिक्रमण हटवून ‘अटल घनवन’ उपक्रमाच्या कामास सुरुवात करण्यात आली.
 
 
अटल घनवन’ उपक्रमाचा
 
 
ही कारवाई नांदेड उपवनसंरक्षक मनीषा पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक भारत खेळभांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी किशन खंदारे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान वन अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी करून वनविभागाच्या हक्काची जमीन ताब्यात घेतली.atal ghanvan अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी ‘अटल घनवन’ विकसित करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ व भविष्यातील हरित विकास लक्षात घेऊन हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
 
कारवाईवेळी वनपाल सुनील ढगे, अण्णासाहेब वडजे, भारत काकडे, प्रिया साळवे, विभुते, वनरक्षक बजरंग देवकते, सुधीर कळलावे यांच्यासह हदगाव व हिमायतनगर वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वन विभागाच्या या कारवाईमुळे शासकीय वनजमिनीवरील अतिक्रमण रोखण्यास मदत होणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया आणखी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.