गोरक्षकाच्या मारेकऱ्यांवर ‘मकोका’ कारवाई करा

-हिंदू समाजाचा तहसीलवर धडकला मोर्चा -महागावात तीव्र संताप : प्रशासनाला दिले निवेदन

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
mcoca proceeding उमरखेडजवळील सुकळी शिवारात गोवंश तस्करी रोखताना एका धाडसी गोरक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप असून आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाईच्या मागणीसाठी महागाव तहसील कार्यालयावर समस्त हिंदू समाज आणि गोरक्षकांचा मोर्चा काढण्यात आला रविवार, 24 मे रोजी सुकळी येथे गोवंश तस्करी होत असल्याचे पाहून गोरक्षक गजानन सुरोशे यांनी अत्यंत धैर्याने आणि गोसेवेच्या भावनेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते एकटे असतानाही त्यांनी तस्करांचा सामना केला. मात्र, निर्दयी आणि क्रूर आरोपींनी त्यांच्यावर दगड व काठ्यांनी अमानुष हल्ला करून त्यांची जागीच निर्घृण हत्या केली.
 
 
macoca
 
 
 
या घटनेच्या निषेधार्थ महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज, गोरक्षक संघटना व नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, गजानन सुरोशे यांना ‘शहीद गोरक्षक’ घोषित करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने द्यावी, गोहत्या प्रतिबंधक कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, गोरक्षकांना विशेष सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी केली. या मोर्चात महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज व गोरक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते.mcoca proceeding हे निवेदन तहसीलदार अभय मस्के, नायब तहसीलदार गजानन पराते, महागावचे ठाणेदार धनराज निळे यांनी स्वीकारले.