बाभुळगाव खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

:जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
prepared fraudulent documents तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी खोटे कागदपत्र तयार करून मुख्यालयी राहत असल्याबाबत मासिक वेतनाच्यावेळी प्रमाणपत्र सादर करीत असल्याची तक्रार तालुका विकास मंचकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आल्याने प्रशासनात मोठीच खळबळ उडाली आहे. यातील दोषींवर कारवाई करावी अन्यथा धरणे, निदर्शने आदी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा तालुका विकास मंचचे अध्यक्ष अभियंता प्रकाश जानकर यांनी दिला असून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून काय कार्यवाही केली जाते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 
 
prepared fraudulent documents
 
 
मासिक वेतनाच्या वेळी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून घर भाड्याने घेतले असे खोटे प्रमाणपत्र देण्यात येते, असा स्पष्ट आरोप तालुका विकास मंचातर्फे जिल्हाधिकाèयांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे. दुसरे असे की, अधिकारी बाहेरगावावरून कार्यालयात कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येतात. यामुळे कार्यालयात कोणीही कर्मचारी वेळेवर येत नाहीत. यामुळे आपले काम घेऊन येणाèया खेड्यातील नागरिकांना तासन्तास अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पहात बसावे लागते. याचवेळी तेथील एक कर्मचारी साहेब मिटिंगला गेले, दौऱ्यांवर आहेत, आत्ताच गेले, पाचच मिनिट झाले असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जाते. नागरिकांची बरीचशी कामे ऑनलाईन मंजुरीची असतात. त्यात लोड शेडिंग, सर्व्हर डाऊन हा प्रश्न नेहमी राहतोच.
 
मजूर वर्ग आपली मजुरी पाडून तालुक्याच्या ठिकाणी येतो. त्याला आल्या पावली परतावे लागते. त्याची मजुरीही बुडते व कामही होत नाही. असे त्याचे दोन्हीकडून नुकसान होते. आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास वेगळाच यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनासोबत अधिकाऱ्यांच्या नावाची लांबलचक यादीच जोडण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याच्या नावासमोर त्याचे पद व ते मुख्यालयी राहतात किंवा नाही असे नमूद केलेले आहे. या निवेदनात तालुका स्तरावरील केवळ दोन-तीन अधिकारीच मुख्यालयी राहतात इतर कोणीही राहत नाही असे स्पष्टपणे नमूद केले असून खोटे कागदपत्र तयार करून मुख्यालयी राहत असल्याचे कागदोपत्री दाखविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मंचाने केली असून या तक्रारीमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाल्याचे दिसत आहे. या निवेदनावर तालुका विकास मंचचे अध्यक्ष प्रकाश जानकर यांच्यासह इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासाअंती काय कारवाई केली जाते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.