तभा वृत्तसेवा
वणी,
sarpanch tukaram mathankar तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे उमरी गावावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतने केलेले नियोजनबद्ध कामकाज, पारदर्शक प्रशासन आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे ग्रामपंचायतीला हा मानाचा बहुमान मिळाला. अभियानांतर्गत गावातील विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, नागरिक सुविधा, लोकसहभाग आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची दखल घेण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीमुळे गावात विकासकामांना गती मिळाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण विकासाच्या दिशेने उमरी ग्रामपंचायतने आदर्शवत कामगिरी केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत प्रतिक्रिया देताना सरपंच तुकाराम माथनकर म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून प्रशासक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि समस्त उमरी गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्याचे हे यश आहे.sarpanch tukaram mathankar सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून गावाचा सर्वांगीण विकास साधता आला. एकत्रित प्रयत्न, पारदर्शक प्रशासन आणि सर्वांगीण विकासातून समृद्ध गाव, समृद्ध गावकरी हा संदेश देत उमरी ग्रामपंचायतने ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे.