नागपूर
school items Expensive जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच पालकांच्या घरात महागाईचा सायरन वाजला आहे. डिझेल, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि कागदाच्या पल्पचे दर 30 टक्क्यांनी वाढल्याने यंदा नागपुरातील घाऊक, किरकोळ बाजारांत वह्या, पाठ्यपुस्तके, गणवेश, दप्तरांचे दर 40 ते 60 टक्क्यांनी वाढले असून, ब्रॅण्डेड वह्यांचे भाव तर थेट दुपटीच्या जवळ पोहोचले आहेत.
school items Expensive कच्चा माल महागला
वूड पल्प व वेस्ट पेपरच्या आंतरराष्ट्रीय किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चीन व युरोपमधून होणारी आयात महागली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने देशांतर्गत पेपर मिल्सने दर वाढविले आहेत. कागदाचा दर 70 रुपये किलोवरून 110 रुपये किलो झाला आहे.
school items Expensive इंधन दरवाढ व वाहतूक खर्च
डिझेलचे दर 98 रुपये प्रतिलिटरवर पोहोचल्याने वाहतूक खर्च दुपटीहून अधिक वाढला आहे. पेपर मिलपासून घाऊक बाजार, घाऊक ते किरकोळ दुकानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वाहतूक भाडे वाढले आहे.
school items Expensive गणवेश व इतर साहित्य
इंधन दरवाढीमुळे कापड, रसायने, प्लॅस्टिक, लोखंड यांचे दरही वाढले आहेत. गणवेशासाठी लागणारे सुती व पॉलिस्टर कापड आणि प्रोसेसिंगसाठी लागणारी रसायने 20-25 टक्क्यांनी महागली आहेत. त्यामुळे गणवेश, दप्तर, वॉटर बॉटल, कंपास बॉक्स यांचे दरही 30-45 टक्क्यांनी वाढले आहेत.
school items Expensive जीएसटी कमी करावा
गेल्या वर्षी दोन मुलांचे शालेय साहित्य 3,500 रुपयांत झाले होते. यंदा तीच यादी 5,800 रुपयांवर गेली आहे. वह्या-पुस्तकांवरील जीएसटी सरकारने कमी करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.