कॉक्रोच जनता पार्टीवरून अतुल कुलकर्णींचा सरकारला टोला

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई
Atul Kulkarni सोशल मीडियावर अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या उपक्रमावर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मार्मिक भाष्य केले आहे. थर्मोमीटरचे उदाहरण देत त्यांनी समाजातील असंतोष, लोकभावना आणि सरकारची प्रतिक्रिया यावर सूचक शब्दांत भाष्य केले असून त्यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
 

Atul Kulkarni  
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये थर्मोमीटरचे उदाहरण दिले. “अंगाला हात लावून ताप आहे असं वाटत असतं, पण थर्मोमीटर लावलं की शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं. CJP नं थर्मोमीटरचं काम केलंय,” असे त्यांनी म्हटले आहे.पुढे त्यांनी लिहिले की, “थर्मोमीटरलाच डॉक्टर आणि इलाज समजणं योग्य नाही. थर्मोमीटर चुकीचं तापमान दाखवतंय असं म्हणणं वेगळं, ते एखाद्या कंपनीनं बनवलंय म्हणून त्यावर संशय घेणं वेगळं आणि ते आपल्याला हवं ते तापमान दाखवत नाही म्हणून ते फोडून टाका म्हणणं वेगळं.” त्यांनी “थर्मोमीटर चुकतंय असं वाटत असेल तर सेकंड, थर्ड ओपिनियन घेणं हेच शहाणपणाचं,” असेही नमूद केले.
 
अतुल कुलकर्णी यांच्या या पोस्टकडे Atul Kulkarni समाजातील दडपल्या गेलेल्या असंतोषाच्या अभिव्यक्तीच्या रूपात पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांतील सामाजिक आणि राजकीय वातावरणावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी समर्थन दर्शवले असून काहींनी त्यावर टीकाही केली आहे.दरम्यान, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाभोवती सुरू झालेल्या चर्चेमुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असंतोष आणि राजकीय व्यंग यांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.