महायुतीचा दावा फॉर्म्युलानुसार ‘सर्व जागा जिंकू’

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई/नवी दिल्ली
Eknath Shinde विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने आणि आधी ठरवलेल्या सूत्रानुसार होईल, असे सांगितले.
 
 

Eknath Shinde  
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच स्पष्ट केला असल्याचे नमूद केले. त्यामुळे कोणतीही गोंधळाची स्थिती नसून सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “महायुती सर्व १७ जागांवर विजय मिळवेल,” असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षणाच्या Eknath Shinde मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी सरकार संवेदनशील असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणबी प्रमाणपत्र, न्यायमूर्ती शिंदे समिती आणि १० टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षण यांसारखे महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले.“जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असेही शिंदे यांनी म्हटले. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चेचा मार्ग खुला असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
 
 
समान नागरी कायदा (Uniform Civil Code) यावरही शिंदे यांनी भूमिका Eknath Shinde स्पष्ट केली. “एक देश, एक कायदा” ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असल्याचे सांगत महाराष्ट्रातही यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, हा कायदा लागू करताना आदिवासी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती आणि मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरील भूमिका यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.