इम्रान हाश्मी भोंदू अशोक बनणार?

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई
Emraan Hashmi नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आता चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि दैवी शक्तींच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणाला ‘खरात फाईल्स’ म्हणूनही ओळखले जाते. आता याच घटनांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
 

Emraan Hashmi, Ashok Kharat movie, 
या गाजलेल्या प्रकरणावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरुप सावंत करणार आहे. चित्रपटाच्या नावापासूनच या प्रकरणाची गंभीरता आणि त्यामागील कथानक अधोरेखित होत असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
अशोक खरातच्या भूमिकेसाठी इम्रान हाश्मी यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून निर्मात्यांकडून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भात इम्रान हाश्मी यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे समजते.
दरम्यान, मराठी अभिनेत्री Emraan Hashmi  आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपाली सय्यद याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत त्या झळकणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात प्रहार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.