आयपीएलमध्ये अपयश, अखेर पंतने घेतला मोठा निर्णय

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई,
Failure in the IPL आयपीएल २०२६ हंगामात निराशाजनक कामगिरीनंतर लखनौ सुपर जायंट्स संघात मोठी घडामोड घडली आहे. संघाचा कर्णधार ऋषभ पंत याने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला असून, फ्रँचायझीकडे त्याबाबत अधिकृत विनंतीही केली होती. संघ व्यवस्थापनाने त्याची विनंती स्वीकारत पंत आता एलएसजीचा कर्णधार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
Failure in the IPL
 
लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली. आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात फ्रँचायझीने ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. Failure in the IPL मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पंतच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ऋषभने कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही त्याचा आदर केला. अशा प्रकारचे निर्णय घेणे सोपे नसते. कर्णधार म्हणून त्याने ड्रेसिंग रूममध्ये दिलेले योगदान महत्त्वाचे होते. आता संघाच्या पुनर्बांधणीवर आणि आगामी हंगामासाठी मजबूत संघ उभारण्यावर आमचे लक्ष असेल.”
 
मात्र, संघाचा पुढील कर्णधार कोण असेल याबाबत फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांत संघ व्यवस्थापन नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. Failure in the IPL गेल्या दोन हंगामांत त्याने २८ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, मात्र त्यापैकी केवळ १० सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर १८ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल २०२५ मध्ये एलएसजीने १४ पैकी ६ सामने जिंकत गुणतालिकेत सातवे स्थान मिळवले होते. तर यंदाच्या हंगामात संघाची स्थिती अधिक खराब झाली आणि १४ पैकी फक्त ४ सामने जिंकून संघ तळाशी राहिला.
 
फलंदाजीमध्येही पंतची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली. गेल्या दोन हंगामांमध्ये त्याने २६ डावांत ५८१ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. त्याचा स्ट्राइक रेट १३५ पेक्षा अधिक राहिला. मात्र, आयपीएल २०२६ मध्ये त्याची फलंदाजी अपेक्षेइतकी प्रभावी ठरली नाही. Failure in the IPL या हंगामात तो १४ सामन्यांत केवळ ३१२ धावा करू शकला. दरम्यान, पंतच्या या निर्णयानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला असून, आगामी हंगामासाठी संघ कोणत्या नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.