नागपूर
Farmers Monsoon Nagpur रोहिणी नक्षत्रला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, बियाणे, खते आणि औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे.
Farmers Monsoon Nagpur उन्हाचा तडाखा कायम असतानाच रोहिणी नक्षत्रब सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रोहिणी नक्षत्रत पाऊस पडला तर खरीप हंगाम चांगला जातो, अशी शेतकèयांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. किन्ही गावातील शेतकरी रामराव पाटील सांगतात, नांगरणी झाली आहे. शेणखत टाकून झाले. आता फक्त पावसाची वाट बघतोय्. पाऊस वेळेवर आला तर कापूस आणि सोयाबीनची पेरणी करणार.
Farmers Monsoon Nagpur हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून 27 मे ते 1 जूनदरम्यान केरळात दाखल होईल. महाराष्ट्रात 7 ते 15 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. कोकणात हजेरी लावल्यानंतर तो विदर्भ व मराठवाड्यात पोहोचेल.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले, शेतकèयांनी प्रमाणित बियाणेच वापरावे. पेरणीची घाई करू नये. जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी.
Farmers Monsoon Nagpur बाजारपेठांमध्ये लगबग
कृषी सेवा केंद्रांवर बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकèयांची गर्दी वाढू लागली आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या बियाणांना मागणी आहे. बँकांमध्ये पीक कर्जासाठी शेतकèयांच्या रांगा लागत आहेत. पाणीसाठ्याची स्थिती मात्रब चिंताजनक आहे. कास तलावासह अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे वेळेवर आणि चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.
मान्सून आगमनाचे अंदाजित वेळापत्र्क
मान्सून केरळात प्रवेश केल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देश व्यापतो. महाराष्ट्रात दरवर्षी 7 ते 15 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. कोकण किनारपट्टीवर आधी हजेरी लावल्यानंतर तो विदर्भ व मराठवाड्याकडे सरकतो. गोव्यात 7 ते 10 जूनदरम्यान मान्सून दाखल होतो.