भरदुपारी राळेगावात अग्नितांडव

    दिनांक :29-May-2026
Total Views |
दोन दुकाने जळून खाक : लाखोंचे नुकसान

राळेगाव, 
Inferno in Ralegaon तालुक्यातील रावेरी पॉईंट टर्निंगवर शुक्रवार, 29 मे रोजी भरदुपारी 3 च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असून सूर्यदेव अक्षरशः आग ओकत आहेत. अशा परिस्थितीत या दोन्ही दुकानांना आगीने आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, यवतमाळ, कळंब, राळेगाव अशा तीन अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियत्रंण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
Aag dksl
 
मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव शहरातील वर्दळीच्या रावेरी पॉईंट टर्निंगवर एक शीतपेय आणि एक दुचाकी पंक्चर काढण्याचे दुकान आहे. दुपारी 3 च्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागली. तीव्र उन्हात आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. दुकान मालकांना आतले साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. शीतपेय दुकानातील फ्रीज, मालाचा साठा आणि पंक्चर दुकानातील संपूर्ण साहित्य व यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
 
 
 
Inferno in Ralegaon घटनेची माहिती मिळताच राळेगाव नगर पंचायतच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. आग नियंत्रणात येत नसल्याने थेट यवतमाळ, कळंब येथूनदेखील अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवहानी झाली असली तरी गरीब दुकानदारांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने परिसरात हळहळ आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.