अहमदाबाद
Gujarat Titans आयपीएल २०२६ च्या १९व्या मोसमातील अंतिम टप्पा अत्यंत उत्कंठावर्धक अवस्थेत पोहोचला असून शुक्रवारी, २९ मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर २ सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असून पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना पूर्णपणे ‘करो या मरो’ स्वरूपाचा ठरणार आहे.
दरम्यान, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ मध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत आधीच स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या अंतिमवादी संघाचा निर्णय गुजरात आणि राजस्थान यांच्यातील या निर्णायक लढतीत होणार आहे. आरसीबीच्या प्रतीक्षेत असलेल्या फायनलमध्ये कोणता संघ सामील होणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी पाहता गुजरातचे वर्चस्व दिसून येते. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये आयपीएलच्या इतिहासात एकूण १० सामने खेळले गेले असून गुजरात टायटन्सने त्यापैकी ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थानला मात्र फक्त ३ सामन्यांत यश मिळाले आहे. त्यामुळे आकडेवारीच्या दृष्टीने गुजरातचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट होते.
राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर Gujarat Titans सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर मात करत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, साखळी फेरीत टॉप-२ मध्ये स्थान मिळवल्यामुळे गुजरातला क्वालिफायर १ मधील पराभवानंतरही अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळाली आहे. मात्र ही गुजरातसाठी शेवटची संधी असून या लढतीत चूक करण्यास जागा उरलेली नाही.
गुजरात आणि राजस्थान Gujarat Titans दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात प्रत्येकी दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्सने २००८ आणि २०२२ मध्ये अंतिम सामना खेळला आहे, तर गुजरात टायटन्सने २०२२ आणि २०२३ मध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी कोणता संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या मोसमात गुजरात आणि राजस्थान यांच्यातील ही तिसरी भेट असणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे या निर्णायक लढतीत कोण वर्चस्व मिळवणार याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.गुजरातला मिळालेली दुसरी संधी ते फायनलमध्ये रूपांतरित करण्यात यश मिळते का, की राजस्थान पुन्हा एकदा दबावाखाली दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारते, याचा फैसला या महत्त्वपूर्ण सामन्यात होणार आहे.