Biometric Attendance सध्या अकरावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होतील. तत्पूर्वी, 15 जूनपासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू होत आहे. मात्र, यंदा अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहावेच लागणार आहे. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन महाविद्यालयात अनुपस्थित राहणाèया विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेèयांची नजर असणार आहे. याशिवाय, या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचेही बंधन असेल.
Biometric Attendance इयत्ता अकरावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक असणार आहे. शाळांनी यू-डायस क्रमांक व मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे. कनिष्ठ महाविद्यालयांनी परिसरातील कोणत्या खाजगी कोचिंग क्लासेससोबत टायअप व करार केला आहे का, याचीही गोपनीय पडताळणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला बायोमेट्रिक मशीनवर दररोज हजेरी नोंदवावी लागेल.
Biometric Attendance दररोज वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवीत असताना मुख्याध्यापकांना प्रत्येक वर्गातील उपस्थिती सीसीटीव्ही कॅमेèयाद्वारे पाहावी लागेल, असेही शिक्षणाधिकाèयांनी सांगितले. त्याचा कृती आराखडा सध्या तयार करण्यात आला असून, तो सर्व महाविद्यालयांना पाठविला जाणार आहे. त्यानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रभावी अंमलबजावणी करावीच लागेल.
Biometric Attendance ‘सीसीटीव्ही’चे रेकॉर्डिंग जतन करावे लागणार
इयत्ता अकरावी, बारावीच्या वर्गात प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी शाळेत कमी आणि खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नियमित हजेरी लावतात, अशा तक्रारी येत आहेत. काही शाळांनी खाजगी कोचिंग क्लासेससोबत करार केल्याच्याही तक्रारी आहेत. या पृष्ठभूमीवर आता जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय, प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग साठवून ठेवावे लागणार आहे.