नवी दिल्ली,
Kerala Monsoon श्रीलंकेतील कमी दाबाच्या वादळी वाèयांमुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. आता मान्सून 7 दिवसांनंतरच केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवली आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून साधारण तः 1 जूनपर्यंत पोहोचतो. यापूर्वी हवामान विभागाने 26 मेपर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता हवामानाचे गणित गडबडले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, यावेळी देशात सरासरी केवळ 78 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. 1971-2020 च्या आकडेवारीनुसार देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस मानला जातो. यापूर्वी हवामान विभागाने 13 एप्रिलला यंदा 80 सेंटीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता.
जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट
आयएमडीनुसार, Kerala Monsoon जून-जुलैमध्येही उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सामान्यतः त्यावेळी तापमान 30-35 अंश सेल्सिअसपर्यंत असते. यावेळी तापमान 3 अंश सेल्सिअसने जास्त राहील, असा अंदाज आहे.हवामान विभागानुसार, जूनमध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. तर महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सामान्य पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातही पावसाचे प्रमाण कमीच
हवामान विभागानुसार, यावर्षी मान्सूनच्या कोर झोनमध्ये कमी पाऊस पडेल. मान्सून कोर झोन हा भारतातील असा प्रदेश आहे जिथे शेती सर्वाधिक मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. या भागात पाऊस चांगला किंवा खराब पडला, तर त्याचा थेट परिणाम पिके, शेतकरी आणि अन्न उत्पादनावर होतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहारचे काही भाग या प्रदेशात येतात.