वीज पडून बैल आणि गोऱ्हा ठार

    दिनांक :29-May-2026
Total Views |
शेतीच्या तोंडावरच शेतकऱ्याचे नुकसान

मारेगाव, 
Ox killed by lightning strike शेतामध्ये कडुनिंबाच्या झाडाला बांधलेल्या बैलांवर वीज पडून दोन्ही बैल जागीच ठार झाले. ही घटना गुरुवार, 28 मे च्या संध्याकाळी पाचच्या दरम्यान चोपन येथे घडली. यामध्ये शेतकèयाचे एक ते सव्वा लाखाचे नुकसान झालेे आहे. ऐन शेतीच्या हंगामाच्या तोंडावरच मोठे नुकसान झाल्याने या शेतकèयासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.
 
 
vij
 
Ox killed by lightning strike  चोपन येथील शेतकरी मंगेश जनार्धन खिरटकर (वय 42) यांची चोपन हिवरा शिवाराच्या मध्ये 1.32 हेक्टर शेती आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता आकाशामध्ये ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. पावसाचासुद्धा अंदाज यायला लागला. त्यामुळे मंगेश हे त्यांचा मुलगा श्रेयस याला घेऊन ठेक्याने केलेल्या शेतामध्ये असलेल्या मुगाच्या कुटारावर गोणा झाकायला शेतामध्ये गेले होते. त्यांनी त्यांचे दोन्ही बैल कडुनिंबाच्या झाडाखाली बांधले आणि दोघेही बापलेक कुटारावरती गोणा झाकू लागले. अशातच आकाशामध्ये जोराने वीज कडाडली आणि निंबाच्या झाडाखाली बांधून असलेल्या दोन्ही बैलांच्या अंगावर पडली. यात पाच वर्षे वयाचा धामणा रंगाचा एक बैल आणि तीन वर्षे वयाचा धवèया रंगाचा एक बैल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामाच्या तोंडावरच शेतकèयाचे लाख ते सव्वा लाखांचे नुकसान झालेले आहे. गरीबीची परिस्थिती आणि ऐन शेतीच्या हंगामात मोठे नुकसान झाल्याने या शेतकèयासमोर आता शेती कशी करायची हा यक्षप्रश्न उभा राहिलेला आहे.