आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ,
Vasantrao Naik Government Medical Hospital येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करण्यास भाग पाडणे, रक्त अनेक महाग रक्त तपासण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळेत पाठविणे, मोफत रुग्णवाहिका न मिळणे, 108 ला कळविल्यास रुग्णवाहिका वेळेवर न पोहचणे, जन्म-मृत्यू नोंदणीसाठी व शवविच्छेदनगृहात अवैध वसुली होत असल्याच्या तक्रारी आहेत.
Vasantrao Naik Government Medical Hospital या सर्व प्रकारांवर तत्काळ कारवाई करून रुग्णांना दिलासा द्यावा, अन्यथा रुग्णालय प्रशासनासह शासनाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. यावेळी आप जिल्हा प्रमुख मोबीन शेख, जिल्हा महासचिव अॅॅड. मनीष माहुलकर, आकाश चमेडिया, प्रकाश डब्बावार, संध्या भवरे, प्रतीक्षा रहांगडाले, कल्पना गजभिये, फजलू खान व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.