संतापजनक प्रकार! भर रस्तात दाम्पत्याला मारहाण

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पुणे
Wagholi road  पुण्यातील वाघोली परिसरात कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादातून एका निष्पाप दाम्पत्यावर तिघा हल्लेखोरांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत दाम्पत्यासोबत असलेला त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 

Wagholi road  
ही घटना २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. संबंधित दाम्पत्य आपल्या तीन वर्षांच्या मुलासह वाघोली परिसरातील डेकॅथलॉन मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदी आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत असताना वाघोलीतील एका चौकात यू-टर्न घेत असताना खडकीच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.अपघातानंतर दुचाकीवरील शुक्ला दाम्पत्याने संयम राखत कारचालकाला फक्त “गाडी हळू चालवा” असा साधा सल्ला दिला. मात्र हा सल्ला कारमधील तिघांना जिव्हारी लागल्याने वादाला सुरुवात झाली. काही क्षणांतच हा वाद विकोपाला जाऊन हिंसक झटापटीत बदलला.
कारमधून उतरलेल्या Wagholi road  तिघांनी रस्त्याच्या मधोमधच पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीदरम्यान दुचाकीवर बसलेला त्यांचा तीन वर्षांचा लहान मुलगा रस्त्यावर पडून जखमी झाला. भररस्त्यात सुरू असलेला हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या घटनेनंतर जखमी दाम्पत्याने तातडीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तिघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.दरम्यान, पुणे शहरात वाढत असलेल्या रोड रेज घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रस्त्यांवरील गुंडगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील वाहतूक शिस्त आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.