बंगालमध्ये 335 घुसखोर ताब्यात

डिटेक्ट-डिलीट-डिपोर्ट’ धोरणांतर्गत कारवाई, प्रशासन सतर्क

    दिनांक :29-May-2026
Total Views |
कोलकाता,
West Bengal Illegal Immigrants Detention पश्चिम बंगाल सरकारने अवैध घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यभरात 11 कोठडी केंद्रे स्थापन केली आहेत. सध्या या केंद्रांमध्ये 335 संशयितांना ताब्यात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई ’डिटेक्ट-डिलीट-डिपोर्ट’ धोरणांतर्गत कारवाई केली जात आहे.
 

West Bengal Illegal Immigrants Detention  
बांग्लादेशच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बसीरहाट परिसरात सर्वाधिक संशयित ओळखले गेले आहेत. येथे बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या असण्याची शक्यता आहे. ही कोठडी केंद्रे विविध पोलिस जिल्हे आणि प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये चालवली जात आहेत. यामध्ये बरुईपूर, सुंदरबन, बसीरहाट, बोंगाव, बारासात, मुर्शिदाबाद, जांगीपूर आणि कृष्णनगर यांचा समावेश आहे. मालदा, कूचबिहार आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यांमध्येही अशीच केंद्रे उभारण्यात आली आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, West Bengal Illegal Immigrants Detention या केंद्रांमध्ये एकूण 335 जणांना ठेवण्यात आले आहे. यात 148 पुरुष, 99 महिला आणि 88 मुलांचा समावेश आहे. त्यांची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात जिल्हा प्रशासनाला परदेशी नागरिकांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
सीमेवर बांगलादेशी नागरिकांची गर्दी वाढली
पश्चिम बंगाल सरकार आणि प्रशासनाने कथित बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखण्याची मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी सकाळी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बसीरहाट भागातील हकीमपूर तपासणी नाक्यावर मोठ्या संख्येने बांगलादेशी पुरुष आणि महिला दाखल झाले. यापैकी बरेच लोक बèयाच काळापासून बंगालच्या विविध भागांमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते. घुसखोरांना पकडणे, त्यांची ओळख पटवणे आणि त्यांना हद्दपार करण्याच्या अलीकडील वृत्तांमुळे सीमेवर गर्दी वाढली आहे.
 
 
तात्पुरत्या निवाèयात काय चालले आहे?
या कारवाईसाठी मालदाWest Bengal Illegal Immigrants Detention  जिल्हा एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आला आहे. इंग्लिश बाजार परिसरातील चंदन पार्कमध्ये पहिले तात्पुरते निवाèयाचे केंद्र उघडण्यात आले आहे. सध्या तेथे तीन महिला आणि सहा अल्पवयीन मुलांसह नऊ संशयित बांगलादेशी नागरिकांना ठेवण्यात आले आहे. केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, पोलिस, नागरी संरक्षण दल आणि इतर कर्मचारी 24 तास त्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या या लोकांच्या कागदपत्रांची आणि ओळखीची तपासणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.