फायनलच्या दारात कोण पोहोचणार? राजस्थान-गुजरात सामना रंगात

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुल्लानपूर,
Rajasthan Gujarat match heats up आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर हायव्होल्टेज सामना रंगला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे.
 
Rajasthan Gujarat match heats up
 
राजस्थान रॉयल्सने या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे गुजरात टायटन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करत संघाला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. Rajasthan Gujarat match heats up हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असून, ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध जेतेपदासाठी लढणार आहे. पराभूत संघाची स्पर्धेतील मोहीम येथेच संपुष्टात येणार आहे.
 
राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामात अखेरच्या टप्प्यात दमदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. लीग फेरीत १६ गुणांसह त्यांनी पात्रता मिळवली होती. Rajasthan Gujarat match heats up त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४७ धावांनी शानदार विजय मिळवत त्यांनी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. त्या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
 
दुसरीकडे गुजरात टायटन्सने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवले. Rajasthan Gujarat match heats up मात्र, पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून ९२ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने धडाकेबाज फलंदाजी करत ३३ चेंडूंमध्ये ९३ धावा केल्या होत्या. त्या विजयासह बंगळूरने थेट अंतिम फेरी गाठली. आता गुजरात टायटन्ससमोर अंतिम फेरीत पोहोचण्याची शेवटची संधी आहे, तर राजस्थान रॉयल्स सलग दमदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे.