मुंबई
Yo Yo Honey Singh लोकप्रिय रॅपर आणि गायक यो यो हनी सिंहने त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे भाष्य केले आहे. एकेकाळी बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या हनी सिंहने बायपोलर डिसॉर्डरशी झुंज देताना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेल्याचे सांगितले आहे. इतकंच नव्हे, तर त्या काळात आपण देवाकडे मृत्यूची प्रार्थनाही केली होती, असा धक्कादायक खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत केला.
2014 च्या सुमारास ‘सनी सनी’, ‘मनाली ट्रान्स’, ‘चार बोतल’ आणि ‘आता माझी सटकली’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे हनी सिंह लोकप्रियतेच्या शिखरावर होता. चित्रपट असो किंवा म्युझिक अल्बम, त्याच्या रॅपशिवाय प्रोजेक्ट अपूर्ण वाटत असल्याचं चित्र त्या काळात होतं. मात्र त्यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला आणि अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहिला., “मी त्या काळात सर्वांत मोठा सुपरस्टार होतो. पण हळूहळू माझ्यात बायपोलर डिसॉर्डरची लक्षणं दिसू लागली. मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. कोणाशी बोलत नव्हतो, कोणालाही भेटत नव्हतो. इंटरनेट, टीव्ही, रेडिओ आणि मीडियापासून पूर्णपणे दूर गेलो होतो. मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटू लागली होती.”
तो पुढे म्हणाला, “बायपोलर Yo Yo Honey Singh डिसॉर्डर हा असा आजार आहे, ज्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. प्रत्येक गोष्टीवर शंका घेणे , मृत्यूची भीती वाटणे आणि लोकांपासून घाबरणे , अशा गोष्टी त्यात सुरू होतात. या कठीण काळात त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. त्याची आई दिवसाचे 24 तास देवाची आरती लावत असे, जेणेकरून त्याला मानसिक आधार मिळावा. मात्र त्या काळात कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नसल्याचे हनी सिंहने सांगितले .