आर्णी,
Youth Found Dead in Arni माहेर मंगल कार्यालयामागे 31 वर्षे वयाचा इसम पडलेला दिसला. ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित केले. मृतकाच्या आईने माहिती दिल्यावर आर्णी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शास्त्रीनगर भागातील रहिवासी, मृतक आकाश मारोती डांबरे (वय 31) हा हमाली काम करीत होता. गुरुवारी सकाळी आकाश घरून हमालीसाठी गेला. दुपारी 2 पर्यंत तो काम करीत होता. त्यानंतर तो 6.30 च्या सुमारास माहेर मंगल कार्यालयामागे ओट्यावर पडला असल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले.
Youth Found Dead in Arni रुग्णालयात वैद्यकीय अधिकाèयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोळ्याच्या वर जखम असून पोट काळे पडले होते. हाता-पायाला खरचटले होते. आकाशची आई चंदा डांबरे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी मर्ग दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर, प्रदीप खडके, ऋषीकेश इंगळे व कर्मचाèयांनी आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आकाशच्या मागे आई, दिव्यांग भाऊ, पत्नी, एक मुलगा, मुलगी आहे. ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, विजय चव्हाण अधिक तपास करीत आहेत.