वर्धा,
Dr. Bhoyar गुन्हेगारांना जरब बसेल आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहील ही आमची प्राथमिकता आहे. बदलत्या गुन्हेगारी पद्धती लक्षात घेता पोलिस यंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधीक्षक पुंडलिक भटकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. Dr. Bhoyar जिल्ह्यातील प्रत्येक शहरात पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आले आहेत. उर्वरित दोन-तीन शहरांमध्येही काम प्रगतीपथावर आहे. गुन्हेगारांकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापर पाहता, पोलिस विभागानेही तितयाच आधुनिक पद्धतीने सज्ज राहावे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुत ठरत असून गुन्हे प्रतिबंध आणि तपास कार्य अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील ८ ते १० वर्षांत विविध उपक्रम राबविण्यात आले. दारूबंदीवर बोलताना, जिल्ह्याची ही परंपरा कायम राखण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मात्र, केवळ कागदोपत्री बंदी न राहता तिची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात याव्यात. Dr. Bhoyar लोकांच्या भावना लक्षात घेऊन या विषयात प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले. अनेक रस्ते अरुंद असताना त्यावर वाढलेले अतिक्रमण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तबद्ध शहरी व्यवस्थापन यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. Dr. Bhoyar सुधारित निकषावर पोलिस पदभरती, वाहने, नवीन पोलिस स्टेशन इमारत, पोलिस वसाहत आदी प्रलंबित प्रकरणांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी शहरातील अवजड वाहतूक, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखू, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदींबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. शहराचा विकास करताना सुरक्षा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही प्राथमिकता आहे. नवीन उभारण्यात येणार्या सर्व शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सतीचे करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Dr. Bhoyar आपणाकडे असणारी माहिती द्या, त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना आश्वस्त केले.