अनिल कांबळे
नागपूर
Pachpaoli area accident दोन मालवाहू वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला. अवघ्या १० दिवसांवर मुलीचा विवाह सोहळा असतानाच आईवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाचपावली हद्दीतील राणी दुर्गावती चौकात ही हृदयद्रावक घटना घडली. केसरबाई शरणागत (वय ४३, रा. कळमना वस्ती) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.

टुंडीलाल शरणागत (वय ५३, रा. कळमणा वस्ती) हे गुरुवार, ३० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास एमएच ४० / एझेड ७६२९ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नीसह मुलीच्या लग्नाची खरेदी व इतर खर्चासाठी पैसे काढण्यासाठी बँक आॅफ बडोदाच्या एटीएममध्ये गेले होते. एटीएममधून पैसे काढून त्या बाहेर आल्या आणि घरी जाण्यासाठी निघाल्या. बिकानेर पीओपी सेल्स दुकानासमोर त्यांची दुचाकी अचानक बंद पडली. त्यांनी आपली दुचाकी तेथेच नो पार्किंग झोनमध्येविरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या एमएच ०५/ बीके ६९६० क्रमांकाच्या एका मालवाहू वाहनासमोर उभी केली. टुंडीलाल यांची पत्नी केसरबाई या दुचाकीवरून उतरून पतीच्या मागेमागे चालत होत्या. याचवेळी मागून येणाºया एमएच ४० / सीटी ००९८) क्रमांकाच्या दुसºया भरधाव मालवाहू वाहनाने केसरबाई यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाने केसरबाई यांना फरफटत नेऊन समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या मालवाहू वाहनावर जाऊन धडकले. या अपघातात टुंडीलाल हे देखील किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या केसरबाई यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघाताचा संपूर्ण Pachpaoli area accident थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. ट्रकचा चालक भास्कर राऊत हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसºया एका वाहनाला धडक दिली आणि त्या धडकेत केसरबाई शरणागत या चिरडल्या गेल्या.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात Pachpaoli area accident गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आरोपी चालक भास्कर राऊत याला ताब्यात घेतले आहे. टुंडीलाल यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टुंडीलाल शरणागत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी दोन्ही मालवाहू वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक बाबाराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.