सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या घरात १६ लाखाची चोरी

मेमन कॉलनी मधील धक्कादायक घटना

    दिनांक :03-May-2026
Total Views |
सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
कारंजा लाड,
retired police officers house येथील मेमन कॉलनी भाग ३ मध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या घरात अज्ञात चोरांनी १६ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ मेच्या मध्यरात्रीपासून ३ मेच्या पहाटे साडेचार वाजतादरम्यान घडल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे घरातील सदस्य एका खोलीत झोपेत असताना चोरांनी घरफोडी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
retired police officers house
 
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जमील रहीम शेख (वय ५८) हे मुंबई पोलिस दलातून पोनि पदावरून गतवर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी उघडून आत प्रवेश केला. retired police officers house त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे १० तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, विविध दागिने, अंगठ्या, नेकलेस सेट, चेन, मनगटी घड्याळे तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १६.३० लाख रुपयांचा माल समाविष्ट आहे. सर्व दागिने एका पर्समध्ये ठेवले होते.
 
 
या प्रकरणात कारंजा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. retired police officers house घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जयदीप पवार, गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बीबेकर, मोहम्मद परसुवाले, अनिस निनसुरवाले, अमित भगत, नितीन पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान व फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपासणी केली असून, चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.