सेलू,
Dust is a problem दोन वर्षापासून सेलू शहरातील मुख्य चौक असलेल्या यशवंत चौकाचे सौंदर्यीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्या चौकाचे काम पूर्ण कधी होणार असा प्रश्न विचारल्या जात आहे. दोन वर्षापासून सुरू असलेल्या कामामुळे चौकातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. जड वाहनांमुळे रस्त्यावरील खडी उखडली असल्याने वाहने पंचर होण्याची भीती वाहनधारकांमध्ये असेत. धुळीचे कण डोळ्यात जात असल्याने डोळ्याचा आजार वाढत आहे.

धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारले जाते. पण, ते नावापुरतेच असल्याने नागरिक हैराण झाले आहे. याच चौकात शाळा असून विद्यार्थ्यांची वर्दळ असते. Dust is a problem चौकात खोलगट भाग निर्माण झाला असल्याने वाहने वळविताना कधी वाहन घसरेल हे सांगता येत नाही. विकासाच्या नावाखाली दोन वर्षापासून नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याच चौकात अनेक दुकाने असून त्यात हात गाडीवर नाश्ता विक्रीची दुकाने आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या चौकातील कोट्यवधी रुपयाचा उड्डाण पूल पाडून नव्याने चौकाचे नूतनीकरण केले जात आहे. दोन वर्ष झाले अजून किती वर्ष लागणार हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली या चौकाचे सौंदर्यीकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
बांधकामाचा तपशील वार्यावर
या चौकात काम सुरू असले तरी या कामाची निविदा, कंत्राटदार कोण, काम सुरू करण्याची तारीख, काम पूर्ण करण्याची तारीख, देखभाल दुरुस्तीचा कालावधी, Dust is a problem या कामासाठी मंजूर निधी किती याचा फलक मात्र कुठेही लावलेला नसल्याने हे काम कधी पूर्ण होणार हे कळण्यास कुठेही वाव नसल्याने नाही.