श्री चरणीची धार, इंग्लंडचा डाव झाला पार

    दिनांक :30-May-2026
Total Views |
ब्रिस्टल,
IND vs ENG भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत यजमानांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. श्री चरनीच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा डाव १६९ धावांवर आटोपला असून भारतासमोर विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 
IND vs ENG
 
या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ३८ धावांनी जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही विजयी लय कायम ठेवण्याच्या हेतूने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. IND vs ENG या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर संघात परतली असून संघात काही बदल करण्यात आले आहेत. भारताने या सामन्यासाठी अतिरिक्त फिरकी गोलंदाजाला संधी दिल्याचे दिसून आले.
 
इंग्लंडकडून फलंदाजीत काही खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत धावगतीवर नियंत्रण ठेवले. IND vs ENG विशेषतः श्री चरनीने महत्त्वाच्या क्षणी बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भारताकडून स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांसारख्या प्रमुख फलंदाजांकडे या आव्हानाचा पाठलाग करण्याची जबाबदारी असेल. दुसऱ्या टी२० सामन्यातील या लक्ष्याचा पाठलाग करत भारत मालिका जिंकण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.