दारू देण्यास नकार दिल्याने केलेल्या चाकूहल्लयात व्यवस्थापक गंभीर जखमी

    दिनांक :30-May-2026
Total Views |
आर्णी, 
Knife attacks शुक्रवार, 29 मे च्या रात्री अज्ञात व्यक्तीने दारूच्या दुकानाच्या व्यवस्थापकाकडे दारूची मागणी केली. परंतु व्यवस्थापकाने दुकान बंद असल्याचे सांगितले. संतप्त झालेल्या व्यक्तीने 60 वर्षीय व्यवस्थापकावर सपासप चाकूने वार केले व पळून गेला. घटनेची माहिती मिळताच, व्यवस्थापकाच्या कुटुंबियांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले, जिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
Ram rao
 
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी कारवाई करत दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापकाच्या मुलाच्या तक्रारीच्या आधारे, आरणी पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आर्णी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ यवतमाळला पाठवले. माहिती मिळताच ठाणेदार निलेश सुरडकर, मिलिंद पारडकर, दुर्योधन राठोड, गुणवंत बोईनवार, देवानंद मुनेश्वर, आकाश गावंडे, नितीन वास्टर आणि कर्मचाèयांनी घटनास्थळाची पाहणी व सीसीटीव्ही फुटेज तपासले. रामराव मिसाळ यांचा मुलगा रूपमने तक्रार दाखल केली.
 
 
आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी तपास सुरू केला. रात्री 1 वाजता, दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी दुपारी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पारडकर यांनी जमादार संदीप ढेंगे यांच्यासह शासकीय पंचाना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
 
 
Knife attacks  पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड आपल्या सहकाèयांसह, यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रामराव मिसाळ यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेले. जखमी रामरावच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांनी घटनेसंदर्भात त्यांचा जबाब घेतला. ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि मिलिंद पराडकर, जमादार संदीप ढेंगे आणि इतर प्रकरणाचा तपास करीत असून दुसरे पथक फरार अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.