60 टक्के डिझेल शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवा : आ. बाबुराव कदम

    दिनांक :30-May-2026
Total Views |
हदगाव,
MLA Baburao Kadam खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकèयांना डिझेल टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आमदार बाबुराव कदम यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेल्या एकूण इंधन साठ्यातील किमान 60 टक्के डिझेल हे शेतकरी व कृषी वापरासाठी राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
 
Baburao Kadam
 
सध्या जिल्हाभरात खरीप हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू असून पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. ट्रॅक्टर, पंप, फवारणी यंत्रे तसेच विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर डिझेलवर अवलंबून आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर शेतकèयांना डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने शेतीची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. बाबुराव कदम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. पेट्रोल पंपांवरील एकूण साठ्यातील 60 टक्के डिझेल शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावे, तर उर्वरित 40 टक्के इंधन इतर वाहनांसाठी वितरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ट्रॅक्टर व कृषी वाहनांना प्राधान्याने इंधन देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
MLA Baburao Kadam  शेतकऱ्यांना प्रत्यक्षात प्राधान्य दिले जात आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करावीत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलची उपलब्धता ही शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकèयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.