चिंतामणी देवस्थानचा वाद उच्च न्यायालयात

    दिनांक :30-May-2026
Total Views |
कळंब, 
Shri Chintamani Ganesh Temple संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या, अतिशय पावन पवित्र भगवान श्री चिंतामणी गणेश मंदिराचा वाद सत्तेच्या खुर्चीसाठी की लोण्याच्या गोळ्यासाठी, अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सविस्तर असे की, 2022 मध्ये श्री चिंतामणी देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड झाली होती. परंतु जुन्या विश्वस्त व्यवस्थेने काही तांत्रिक बाबी समोर करत 13 महिने कोणत्याही स्वरूपाचा प्रभार नवीन विश्वस्तांना मिळू दिला नाही. त्यातच नवीन विश्वस्तांमध्ये अध्यक्षपदाकरिता मोठी चढाओढ सुरू होती. परंतु नंतर अध्यक्षांची निवडसुद्धा झाली.
 
 
Chintamani
 
नवीन विश्वस्तांमधून निवडून आलेल्या अध्यक्षांनी मध्येच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा फायदा मंदिराचा विकास व्हावा, असे मनात नसणाèयांनी घेत त्यांना आपल्या गळाला लावत त्यांना चिंतामणी देवस्थानमध्ये पुन्हा सक्रिय केले आणि हा वाद अमरावती चॅरिटी कमिश्नरकडे दाखल केला. चॅरिटी कमिश्नरांनी श्री चिंतामणीच्या जन्मोत्सव काळातच विद्यमान विश्वस्त व्यवस्थेच्या बाजूने निकाल दिला. परंतु काही लोकांनी हा वाद अखेर उच्च न्यायालयात नेऊन ठेवल्यामुळे देवस्थानचा विकासच खुंटल्याची भावना भक्त आणि कळंबवासींमध्ये निर्माण झाली.
 
 
Shri Chintamani Ganesh Temple  त्यामुळे चिंतामणी देवस्थान विकासाकरिता विश्वस्त पुढे येत नसून देवस्थानमध्ये असलेल्या लोण्याच्या गोळ्यावरच सर्वांच्या नजरा आहेत की देवस्थानच्या विकासाकडे, हे सध्या कोणाला कळेनासे झाले आहे. चिंतामणी देवस्थानचा वाद उच्च न्यायालयात पोहोचल्याने यापूर्वी ज्याप्रमाणे कित्येक वर्षे देवस्थानचा विकास रखडल्या गेला होता, त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत असल्याने भक्तगणांमध्ये सध्या रोष निर्माण झाला आहे. येणाèया काळामध्ये चिंतामणी देवस्थानचा विकास होण्याची कुठेही चिन्ह दिसत नसल्याने उच्च न्यायालय कोणता निर्णय देतेे याकडे सध्या भक्तगणांचे लक्ष लागले आहे.