वरूड,
amravati crime अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अयान प्रकरण ताजे असतानाच बेनोडा पोलीस स्टेशन ठाण्यांतर्गत राहत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन युवतीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार पिडित युवतीने बेनोडा (शहिद) पोलिसांत दिली. या जिहादी कृत्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडु नये याकरिता पोलीसांकडून सतर्कता बाळगत गोपीनियता पाळण्यात आली. संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. याप्रकरणात कुठेही गाफील न राहता विना विलंब आरोपीला हिमाचल प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २ मे पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी व त्यानंतर कारागृहात रवानगी केली.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी १६ वर्षीय अल्पवयीन युवती आणि बाबु हसन (२२) रा. मुरादाबाद, उत्तरप्रदेश यांची मागील दोन वर्षापुर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दरम्यान पिडीतने स्वतःचे काही स्लिप घातलेले फोटो त्याला पाठविले. त्याच दरम्यान तो ५ जानेवारीला नागपूर आला तेव्हा त्याने पिडीतेला नागपूरात भेटायला बोलावले. याभेटी दरम्यान तिची इच्छा नसतांना त्याने तिच्या सोबत अश्लील चाळे केले व त्याचे फोटो शुट केले. त्यानंतर एप्रिल महिन्यात पिडीता व आरोपी यांच्यात काही कारणास्तव वाद उफाळून आला. त्यामुळे पिडीतेने त्याचा नंबर ब्लॉक केला. त्यामुळे त्याने चिडून पिडीतेचे आक्षेपहार्य अर्धनग्न फोटो तिच्या आजीला व्हॉटस्अँपवर पाठवले अशी तक्रार पिडितेने पोलिसांत दिली.amravati crime सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला गुरूवार ३० एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील एका फॅक्टरीतुन ताब्यात घेण्यात आले व अमरावती आणण्यात आले. शनिवार २ मे रोजी न्यायालयात हजर केले.
मोबाईलची न्यायवैज्ञानिक तपासणी
आरोपीकडून दोन मोबाईल फोन तसेच मुलीच्या आजीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये मुलीचा स्लिप घातलेला फोटो तसेच आरोपी तिचे चुंबन घेत असलेला फोटो मिळाला आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतेही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हीडीओ मिळालेले नाहीत. सर्व मोबाईलची न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेकडून तपासणी करण्यात येणार आहे. गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ (ए) वाढविण्यात आले आहे.