प्रशासनाच्या सहकार्यामुळे धामणगाव येथील जनजीवन सुरळीत

    दिनांक :05-May-2026
Total Views |
युवकांनी साथ दिल्याने टळली जीवितहानी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मिळाले मार्गदर्शन
 
नागपूर,
Chandrashekhar Bawankule शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग काही मिनीटात संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात कशी घेऊ शकते याचा २ मेच्या रात्री धामणगाव वासियांनी घेतला. नागपूर पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील या अचानक उद्भवलेल्या आगीच्या संकटाने गावकर्‍यांसह संपूर्ण प्रशासनाची परीक्षा घेतली. एका घरा पाठोपाठ तब्बल ५० पेक्षा अधिक घरे आणि जनावराचे गोठे काही मिनीटात आगीत होरपळले. घटनेची वृत्त मिळताच भिवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस रवींद्र म्हसकर आपल्या १५ शिपायांसह गावात पोहचले. गावातील युवाशक्ती आणि पोलीसांनी क्षणात निर्णय घेऊन अगोदर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले.
 
 
bawan
२ मे रोजी सायंकाळच्या सुमाराला लागलेल्या या आगीने सारे गाव खडबडून जागे झाले. वेळेवर पोहचलेले पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी आणि गावकर्‍यांनी एकमेकांच्या धैर्यातून गावाला जीवीतहानीपासून रोखण्यात यश मिळविले. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व स्थानिक पदाधिकार्‍यांना संपर्क साधून सर्व प्रकारची मदत तत्काळ धामणगावला पोहचविण्याचे निर्देश दिले.
 
 
Chandrashekhar Bawankule महसूल विभागाकडून शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात सोळा घरे पुर्णत: क्षतीग्रस्त, नऊ अंशत: आणि चौतीस पुर्णत: नष्ट झालेल्या गोठे/ समावेश आहे. श्री. महालक्ष्मी संस्थान यांचेकडून सर्व बाधित कुटूंबांना २० लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सर्व बाधित कुटूंबांना ७५ किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पशु वैद्यकीय विभागाकडून बाधीत असलेल्या २५ पशु पालकांना चारा उपलब्ध करुन दिला आहे. आधारकार्ड, राशनकार्ड, निवडणूक कार्ड इतर विविध प्रकारचे दाखले जर आगीत नष्ट झाले असतील तर अशा दोन दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्हा खनिकर्म निधीतून आपतग्रस्त कुटुंबाना घर बांधणी साठी अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून अधिकाधिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.