दौंड,
daughter-murdered-by-father : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. देऊळगावराजे हद्दीतील हनुमानवस्ती येथे एका बापाने आपल्या 9 वर्षांच्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या शाळेच्या निकालावरून घरात वाद झाला. या किरकोळ कारणातून संतापलेल्या बापाने रागाच्या भरात मुलीवर हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृतदेहाबाबतही अत्यंत धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.