दीपक अग्रवाल सायबर शाखेचे नवे पाेलिस उपायुक्त

    दिनांक :05-May-2026
Total Views |
नागपूर, 
Deepak Agarwal सायबर पाेलिस ठाण्यातील गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर पाेलिस विभागाची प्रतिमा मलिन झाल्याने पाेलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रशासन विभागाचे पाेलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे तातडीने सायबर शाखेच्या पाेलिस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
 
 
deepak
 
Deepak Agarwal सायबर पाेलिस ठाण्याचे दक्षिण आणि उत्तर अशा दाेन भागांत विभाजनानंतरही वसुलीवरुन वाद झाल्याची प्रकार समाेर आला हाेता. पाेलिस आयुक्तांनी संपूर्ण सायबर शाखेची सूत्रे अग्रवाल यांच्याकडे साेपवली आहेत. पूर्वी सायबर शाखेत लाेहित मताने हेच उपायुक्त हाेते. मात्र, त्यांच्याकडे वाहतूक शाखेच्या पाेलिस उपायुक्त पदाचा पदभार हाेता. ठाण्याचे उत्तर विभागात विभाजनानंतर या शाखेची जबाबदारी ऋषिकेश रेड्डी यांच्याकडे साेपवण्यात आली हाेती. मात्र त्यांच्याकडेही पाेलिस उपायुक्त परिमंडळ दाेनचा पदभार हाेता. दरम्यान सायबर शाखेतील अंतर्गत वादाला ताेंड ुटल्यानंतर पाेलिस उपायुक्तांनी या दाेन्ही पाेलिस ठाण्यांच्या पाेलिस उपायुक्तपदाचा कारभार दीपक अग्रवाल यांच्याकडे साेपवला आहे. पूर्वी अग्रवाल यांच्याकडे आर्थिक शाखा आणि प्रशासन विभागाच्या उपायुक्त पदाचा भार हाेता.