आदिवासी समाज व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कामाचा संकल्प करा

    दिनांक :05-May-2026
Total Views |
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

यवतमाळ,
Tribal society आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांचे हित जोपासून चांगल्या मानसिकतेने काम करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी विकास अमरावती विभाग अपर आयुक्त कार्यालयाच्या वतीने हॉटेल एमडब्ल्यू पॅलेसमध्ये आयोजित शासकीय आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन व समारोप मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, अमरावती विभाग अपर आयुक्त आयुषी सिंह, नाशिक विभाग अपर आयुक्त दिगांबर चव्हाण, मुख्य अभियंता डाबे, सर्व प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
 
 
ashok
 
पुढे बोलताना मंत्री डॉ. उईके म्हणाले, ग्रामीण भागातील आश्रमशाळांत विद्यार्थी प्रवेश संख्या वाढविण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करावे. त्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळांविषयी पालकांचा विश्वास संपादन करून त्यांचे मन परिवर्तन करावे. यासह शासकीय योजनांची जनजागृती करून लोकसहभाग वाढवावा आणि लोकचळवळ निर्माण करावी. आदिवासी विद्यार्थी हा केंद्रबिंदू माणून काम करावे. आदिवासी समाजात परिवर्तन घडविण्यासाठी प्रशासन व आश्रमशाळांनी चांगल्या मानसिकतेचे काम केले पाहिजे. आश्रमशाळेच्या प्रभावी कामकाजासाठी मुख्याध्यापक स्तरावर समित्या गठीत कराव्या. यात प्रवेश, भोजन, दिनचर्या, देखरेख समित्यांचा समावेश असावा, अशा सूचना मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी दिल्या.
 
 
Tribal society  आदिवासी विकास विभागांतर्गत येणाèया योजना, उपक्रम व उल्लेखनीय कार्याबाबत प्रत्येक कार्यालयांनी प्रचार प्रसिद्धीवर भर द्यावा. या माध्यमातून आदिवासी विकास योजना, आश्रमशाळा व वसतीगृहांबाबत समाजात सकारात्मकता निर्माण करावी, असेही ते म्हणाले. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी, आश्रमशाळांमध्ये दिनचर्या, पौष्टीक आहार, आरोग्य तपासणी करावी. तसेच ‘आधी प्रवेश नंतर कागदपत्र’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा. यासह पटनोंदणी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे सांगून शिक्षक क्षमता बांधणीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
गृहपालांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक
आदिवासी वसतीगृहात अनुचित प्रकार घडून नये या उद्देशाने नियंत्रणासाठी गृहपालांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक करून वसतीगृहांची तपासणी करावी. गैरहजर असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी दिले.
पुसद प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांचा सत्कार
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, मुख्याध्यापक रवींद्र घड्याळे, गजानन खडीकर यांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.