IPLमध्ये धमाका एन्ट्री! पदार्पणात पहिल्याच चेंडूवर 6 ठोकणारे ‘धुरंधर’

    दिनांक :06-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ipl-6-on-the-first-bal : इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये काही खेळाडूंनी पदार्पण करतानाच आपल्या खेळीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे काही फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत धमाकेदार सुरुवात केली असून अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची यादी आता चर्चेत आली आहे.
 
 
IPL
 
 
अलीकडेच लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या अक्षत रघुवंशीने मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि तो या खास यादीत सामील झाला. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशीनेही 14 व्या वर्षी लखनौविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपली IPL कारकीर्द सुरू केली होती.
 
या यादीत समीर रिझवीचे नावही आहे. त्याने 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करताना राशिद खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. श्रीलंकेचा महेश तीक्षणानेही 2022 मध्ये आरसीबीविरुद्ध अशीच धमाकेदार सुरुवात केली होती.
 
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सिद्धेश लाडने 2019 मध्ये पंजाबविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. तर वेस्ट इंडिजचा जावोन रॅमन सेर्ल्सने 2018 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
 
अनिकेत चौधरी, कार्लोस ब्रेथवेट, आंद्रे रसेल, केव्हॉन कूपर आणि रॉब क्विनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार मारत चाहत्यांना थक्क केले होते. IPLच्या इतिहासात अशी कामगिरी करणारे खेळाडू फारच कमी असून, ही यादी क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच खास आकर्षण ठरते.