नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Cancer Hospital श्री जैन सेवा मंडळ तर्फे गेल्या २७ वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नि:शुल्क भोजन सेवा अविरतपणे सुरू आहे. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मंडळातर्फे दररोज संध्याकाळी गरीब रुग्णांना भोजन पुरविण्यात येते. तसेच प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी रुग्णांच्या नातेवाईकांनाही भोजन व फळांचे वाटप केले जाते. अत्यंत कठीण व आपत्कालीन परिस्थितीतही हे सेवाकार्य अखंड सुरू ठेवण्यात आले असून, हॉस्पिटल प्रशासनानेही या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.

या सेवाकार्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांचे सहकार्य लाभत आहे. अलीकडेच अनंत मुकेश अंबानी फाउंडेशन तर्फे ३ लाख रुपयांची मदत देण्यात आली. Rashtrasant Tukadoji Maharaj Cancer Hospital तसेच कविता शाह, वीरेन शाह, विमल राजेश शाह, परेशा शाह व निर्मला छेडा यांच्या प्रयत्नातून नागपूर कच्छी महिला मंडळ, के. व्ही. ओ. सखी वृंद, वरिष्ठ सखी ग्रुप, मेडावो ग्रुप आणि श्री नागपूर कच्छी विसा ओसवाल समाज यांच्या सहकार्याने १ लाख ११ हजार रुपयांची देणगी मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह, महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर, सहमंत्री रवींद्र वोरा व बरखा मुणोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.या पवित्र सेवेमुळे गरीब रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळत आहे. अधिक माहितीसाठी महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र