रविवारी रंगणार ‘जगत के नाथ जगन्नाथ’ संगीतमय महोत्सव

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर,
Vasantrao Deshpande Hall रविवार, १० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता वसंतराव देशपांडे हॉल येथे तेजस्विनी मंच तर्फे ‘जगत के नाथ जगन्नाथ’ या संगीतमय नाट्याची प्रस्तुती करण्यात येणार आहे.या नाट्यात परमभक्त माधवदास, कर्माबाई आणि पद्माबाई यांच्या भक्तिमय कथा, मंदिरातील विविध चमत्कार तसेच विज्ञानमय घटनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे.
 
 
 

kim 
 
 
भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक चेतना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने किरण कल्पना क्रिएशन संस्थेद्वारे या नाटकाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन करण्यात आले आहे. Vasantrao Deshpande Hall भगवान जगन्नाथ, सुभद्राजी आणि बलभद्रजी यांचे सजीव देखावे तसेच दिव्य रथयात्रेचे दृश्य हे या नाट्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. जवळपास ८० कलाकारांनी सजलेल्या या भव्य नाट्यप्रयोगाचा आनंद घेण्यासाठी आयोजकांनी सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:अर्चना सोनकुसरे,संपर्क मित्र