नागपूर,
Director Jay Lahori नागपूरचे युवा व प्रतिभावान दिग्दर्शक जय लाहोरी यांनी आपल्या वेगळ्या कथानकांमुळे आणि दमदार दिग्दर्शनामुळे लघुपट विश्वात विशेष ओळख निर्माण केली आहे. सामाजिक विषय, भावनिक कथा आणि वास्तववादी मांडणी यामुळे त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळत आहे.सन २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला “एक सवाल – द डार्क वर्ड” हा लघुपट निर्माता अमित धुपे यांच्या निर्मितीत आणि “सेव्हन हॉर्स एंटरटेनमेंट”च्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने प्रतिष्ठित टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार जिंकून मोठे यश संपादन केले. तसेच या चित्रपटाला रील्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, रोशनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इंडिया आंतरराष्ट्रीय स्टार चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्येही सन्मानित करण्यात आले.
यानंतर जय लाहोरी दिग्दर्शित “झूमरू” या लघुपटाचे चित्रीकरण नागपुरात पार पडले. या चित्रपटाची निवड “लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स २०२२” मध्ये झाली होती. तसेच “झूमरू”ने सिने फेअर चित्रपट महोत्सव आणि वॉलेट चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये विजेतेपद मिळवले.Director Jay Lahori याशिवाय रोशनी चित्रपट महोत्सव २०२२ मध्येही या चित्रपटाचे विशेष कौतुक करण्यात आले जय लाहोरी यांच्या “बचपन” या लघुपटानेही उल्लेखनीय यश मिळवत रील्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ मध्ये विजेता होण्याचा मान पटकावला.अलीकडेच प्रदर्शित झालेला “कुर्सी” हा लघुपट सध्या विशेष चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरमधील कापसी येथे करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लखनौ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये या चित्रपटाची नामांकनासाठी निवड झाली असून चित्रपटाचे प्रदर्शन पीव्हीआरमध्ये करण्यात आले. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्री माही भगत यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
सौजन्य: पियू लाहोरी,संपर्क मित्र