शहरात अग्नितांडव पाच व्यापारी दुकाने जळून खाक -लाखोचे नुकसान

शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

    दिनांक :08-May-2026
Total Views |
देऊळगाव राजा
fire breaks दिनांक आठ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळील व्यापारी दुकानांना अचानकपणे आग लागून यामध्ये पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सदर आग ही विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या अग्नितंडवमध्ये जीवित हानी झालेली नाही.
 

शहरात अग्नितांडव पाच व्यापारी दुकाने जळून खाक 
 
देऊळगाव राजा येथील बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळील व्यापार पेटला सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याचे व्यापारी व नागरिकाच्या निदर्शनास आले . यामध्ये भाकरादेवी आईस्क्रीम व इतर चार दुकाने आगीत भस्मसात झाली . सुरुवातीला एका दुकानाने हळूहळू पेट घेतला व्यापारी व उपस्थित नागरिकांनी ही आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र आगीने भीषण रूप धारण करून लगतचे चार दुकाने आगेच्या कक्षेत आले . पाहता पाहता आगीचे लोड उठू लागले . आणि काळ्याशार धुराने आकाश व्यापू लागले होते. हे अग्नीतांडव पाहून बाजारपेठेत व्यापारी नागरिकांची तारांबळ उडाली व्यापारी साहित्य वाचवण्यासाठी धडपड करू लागले. आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सर्वजण करत होते. दरम्यान नगरपालिकेची अग्निशामक दलाची दोन वाहने पाचारण करण्यात आली. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. बऱ्याच कालावधीनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत व्यापार पेटीतील पाचही दुकानातील साहित्य अग्नीतांडव मध्ये जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र या अग्नीतांडव मध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही .विद्युत शॉर्टसर्किट मुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून आगीत झालेल्या नुकसानाची माहिती घेण्यात येत आहेत. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
 
अग्नीतांडव रौद्ररूप धारण करत असताना नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. आगीच्या घोरपडीत कुकाणे वाचवण्यासाठी आजूबाजूच्या दुकानातील साहित्य बाहेर घेण्यासाठी नागरिक मदतीला धावून आले.fire breaks ज्याच्या जवळ जे साहित्य सापडले त्या साहित्याच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असंख्य नागरिक प्रयत्न करत होते .देऊळगाव राजा हे एकात्मता दर्शवणारे शहर असून सुखदुःखात धावून येणारे नागरिक येथे राहतात याचे दर्शन त्यावेळेस दिसून आले .
नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अटक परिश्रम घेतले. पोलीस यंत्रणा महसूल विभाग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले व्यापार पेठ परिसरामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती .यापूर्वीही याच व्यापारपेठेत दोन वेळा आग लागून लाखोचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळेस व्यापाऱ्यांनी सांगितले .