नागपूर,
Jyotiba Vidyalaya माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारा संचालित ज्योतिबा माध्यमिक विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी शर्वरी दूरतकर हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर सोनाली डेकाटे हिने ८५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. Jyotiba Vidyalaya या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश चतुर्वेदी, सचिव आभाताई चतुर्वेदी, प्राचार्य अरुणा कडू, पर्यवेक्षक वांदे तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:अरुणा कडू,संपर्क मित्र