‘देऊळ बंद २’चा टीझर प्रदर्शित

    दिनांक :08-May-2026
Total Views |

Teaser of Deoo
मुंबई,
Teaser of Deool Band 2 released श्रद्धा, अंधश्रद्धा, देवावरचा विश्वास आणि नास्तिकतेचा संघर्ष याभोवती फिरणारा ‘देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रदर्शित करण्यात आला. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाच्या झलकचित्र प्रदर्शन सोहळ्याला मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते. तसेच चित्रपटाशी संबंधित कलाकार, निर्माते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.चित्रपटाच्या झलकचित्रात एका सामान्य शेतकरी महिलेचा देवाशी थेट संघर्ष दाखवण्यात आला आहे. स्नेहल तरडे यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्ष वेधून घेत असून त्या एका आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक पत्नी म्हणून दिसत आहेत. आपल्या नवऱ्याने मंदिर बंद करून चावी घेऊन निघून गेल्याने संतप्त झालेली ही महिला थेट स्वामींनाच जाब विचारण्यासाठी त्यांना आवाहन करते. तिच्या हाकेला प्रतिसाद देत स्वामी प्रकट होतात आणि त्यानंतर देव व एका सामान्य स्त्रीमध्ये सुरू होणारा संघर्ष चित्रपटाचा मुख्य गाभा ठरताना दिसतो.