मालेगाव,
malegao accident अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर रिधोरा गावाजवळील हॉटेल मामा भांजा समोर गुरुवार ८ में रोजी रात्री भीषण अपघात झाला. स्विफ्ट डिझायर कारने समोर जाणार्या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर क्रमांक एम. एच. ३७ जी. ६९३९ ही कार मेडशीवरून मालेगावकडे येत होती. कारमध्ये संदेश लाहोटी राहणार मालेगाव व अक्षय घुगे राहणार कुरळा हे दोघे प्रवास करत होते. रात्री सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान रिधोरा गावाजवळील हॉटेल मामा भांजा समोर कारने समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अक्षय घुगे याचा जागीच मृत्यू झाला, तर संदेश लाहोटी हा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोस्टे चे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद इंगळे, मनीष राठोड, पोलिस कॉन्स्टेबल राजू महाले, अशोक कोठुळे, धम्मपाल घनबहाद्दूर तसेच महामार्ग सुरक्षा पथक अमानीचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय दाभाडे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे आणि एमएसएफ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.malegao accident पोलीसांनी व स्थानिकांच्या मदतीने जखमी व मृत व्यक्तीस मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर अपघातग्रस्त कार रस्त्याच्या खाली उतरवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.