वाशीम,
washim crime जिल्हामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलिस विभागाकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी वेळोवेळी अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कारवाई करुन गुन्हेगारांना वचक निर्माण केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ८ मे रोजी पोलिस विभागाला गुप्त माहिती मिळाली की, वाकद येथे एक युवक तलवार बाळगुन दहशत निर्माण करीता आहे.
अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि निलेश जाधव व पोलिस अंमलदार यांनी त्वरीत वाकद येथे जावुन परीसरात पाहणी केली असता शोकाभाई नामक युवकावर छापा टाकुन ताब्यात घेतले. त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे शेतात लपवुन ठेवलेल्या दोन धारधार तलवारी काढुन दिल्या. आरोपी गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई वय २८ रा वाकद ता. मालेगांव यांचे विरुध्द पोलिस स्टेशन वाशीम ग्रामीण येथे अपराध क्र २५०/२०२६ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.washim crime सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि निलेश जाधव व स्थागुशा पथकाने परिश्रम घेतले.